भोलेनाथांच्या भक्तांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेनंतर सुरू होऊ शकते अमरनाथ यात्रा

जम्मू : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या संकटकाळात बाबा बर्फानींच्या भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. यावर्षी सुद्धा अमरनाथ यात्रा सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, यावेळेस अमरनाथ यात्रा खुप कमी काळ चालणार आहे. यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे अमरनाथ यात्रा रद्द होण्याचा अंदाज वर्तवला जात होता, परंतु आता सरकारने संकेत दिले आहेत की, यावर्षी अमरनाथ यात्रा सुरू करण्यात येईल. मागच्या दोन-तीन दिवसांपासून अमरनाथ यात्रेची तयारी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. गुरुवारी जम्मूचे डिव्हिजनल कमिश्नर संजीव वर्मांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक झाली आणि विविध विभागांना अमरनाथ यात्रेच्या तयारीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. पर्यटन विभाग, आरोग्य विभाग आणि जम्मू म्युनिसिपल कॉर्पोरेशनला अमरनाथ यात्रेसाठी लवकरात लवकर तयारी करण्यास सांगितले आहे.

यात्रेच्या बेस कॅम्पला सॅनिटाईज करण्याचे निर्देश
कोरोना व्हायरस महामारीमुळे जम्मूत अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प ’यात्री निवास भवन’ ला क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते, जे आता यात्रेकरूंसाठी तयार करण्यात येईल. प्रशासनाने यात्री निवास भवनला पूर्णपणे सॅनिटाईज करणे आणि यात्रेकरूंना राहण्या लायक करण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू सिटीचे डेप्युटी मेयर पुरनिया शर्मा यांनी सांगितले की, जम्मू म्युनसिपल कॉर्पोरेशन ते यात्री निवास भवनला सॅनिटाईज आणि स्वच्छ करण्यात आले आहे. आमचे कर्मचारी अमरनाथ तीर्थयात्रा संपेपर्यंत 24 तास ड्यूटीवर असतील.

जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची होणार तपासणी
सरकारने जम्मूला पोहचणार्‍या यात्रेकरूंची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान ज्या यात्रेकरूंचा रिपोर्ट निगेटीव्ह येईल त्यांनाच पुढील यात्रा करण्याची परवानगी मिळणार आहे. यात्रेकरूंचे सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आरोग्य विभागाला जरूरी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, ही टेस्ट मोफत होणार की, यात्रेकरूंकडून पैसे वसूल करणार याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, अमरनाथ यात्रा आयोजित करणार्‍या श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने अजूनपर्यंत यात्रेबाबत दुजोरा दिलेला नाही.

केवळ बालताल रूटने जाऊ शकतील यात्रेकरू
तर, जम्मूच्या पर्यटन विभागाचे डायरेक्टर राज कुमार कटोच यांनी सांगितले की, 20 जुलैनंतर अमरनाथ यात्रा सुरू होऊ शकते. यावेळेला केवळ बालताल रूटनेच अमरनाथ यात्रेकरू जातील. गुरुवारी जम्मूचे डिव्हिजनल कमिश्नर संजीव वर्मा यांच्यासोबत बैठक झाली होती, ज्यामध्ये आमच्या विभागाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.