Coronavirus : देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच ‘कोरोना’चे 69652 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 28.36 लाखावर

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा आता 28 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 28 लाख 36 हजार 926 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 24 तासात कोरोनाचे विक्रमी 69 हजार 652 नवे रूग्ण सापडले. यापूर्वी 12 ऑगस्टला सर्वात जास्त 67 हजार 66 रूग्ण सापडले होते. बुधवारी 977 रूग्णांचा मृत्यू झाला. मागील 24 तासात 59 हजार 365 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत संसर्गामुळे 53 हजार 994 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताजी आकडेवारी अशी…
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 86 हजार 395 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 53 हजार 866 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 लोक या व्हायरसच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 13,165 नवी प्रकरणे समोर आल्याने, कोविड-19 महामारीच्या एकुण रूग्णांची संख्या वाढून 6,28,642 झाली आहे. एका दिवसात आणखी 346 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत या महामारीमुळे 21,033 लोकांनी जीव गमावला आहे.

24 तासात या राज्यात सर्वात जास्त मृत्यू
एका दिवसात कोरोनामुळे सर्वात जास्त 346 मृत्यू महाराष्ट्रात झाले. तर पंजाब 22, मध्य प्रदेश 18, गुजरात 17, उत्तराखंड 14, जम्मू काश्मीर 11, बिहार, राजस्थान, हरियाणा, ओडिसा आणि आसाममध्ये 10-10, दिल्लीत 9, तेलंगना आणि गोव्यात 8-8, केरळात 7, पुदुचेरीत 6, छत्तीसगढ आणि त्रिपुरामध्ये 3-3 आणि हिमाचल प्रदेशात 2 जाणांचा मृत्यू झाला. सिक्किम, लडाख, चंडीगढमध्ये एक-एक रूग्णाचा मृत्यू झाला.