‘कोरोना’नं स्थिती बिघडली ! भारतात सुरू झाले ‘कम्युनिटी स्प्रेड’, इंडियन मेडिकल असोसिएशनचा दावा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसचा कहर सतत वाढत चालला आहे. देशात रोज 34 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण समोर येत आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायसरच्या रूग्णांची संख्या 10 लाख 38 हजार 715 पेक्षा जास्त झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाचे कम्युनिटी स्प्रेड सुरू झाले आहे आणि स्थिती बिघडली आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेयरपर्सन डॉ. वी. के. मोंगा यांनी म्हटले की, देशात कोरोना व्हायरसच्या रूग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे, जी अतिशय भयंकर स्थिती आहे. एएनआईने डॉ. मोंगा यांच्या संदभाने म्हटले आहे की, भारतात प्रत्येक दिवशी 30 हजारपेक्षा जास्त कोरोना व्हायारसची प्रकरणे वाढत आहेत. ही प्रत्यक्षात देशासाठी खुप वाईट स्थिती आहे. आता येथे कोरोना ग्रामीण भागात पसरत आहे. हे वाईट संकेत आहेत. हे कम्युनिटी स्प्रेड दिसत आहे.

डॉ. मोंगा यांचे हे वक्तव्य अतिशय महत्वाचे आहे, कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतत म्हणत होते की, अजूनपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचे कम्युनिटी स्प्रेड सुरू झालेले नाही. केंद्रीय आरोगय मंत्रालयाच्या या दाव्याला अनेक हेल्थ एक्सपर्टने चॅलेंजसुद्धा केले आहे. यासोबतच कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या प्रकरणात भारत जगातील तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे.

अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात आतापर्यंत 10 लाख 38 हजार 716 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ज्यापैक्की 26 हजार 273 लोकांचा जीव गेला आहे. यापैकी 6 लाख 53 हजार 751 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत, ज्यांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे.

डॉ. मोंगा यांनी म्हटले की, आता कोरोना व्हायरस गाव-खेड्यात पसरत आहे, ज्यामुळे स्थितीवर नियंत्रण मिळवणे खुप अवघड झाले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये तर आम्ही हे कंट्रोल केले आहे, परंतु, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशातील दुर्गम भागात काय होईल?

डॉ. मोंगा यांनी हेदेखील म्हटले की, कोरोना व्हायरस असा आजार आहे, जो खुप वेगाने पसरत आहे. यास तोंड देण्यासाठी राज्य सरकारांनी पूर्ण सावधानी बाळगली पाहिजे आणि केंद्र सरकारकडून मदत घेतली पाहिजे.