Coronavirus : लवकरच संपेल ‘कोरोना’चा हाहाकार, ‘या’ नोबेल विजेत्यानं केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नोबेल पारितोषिक आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ञ मायकेल लेविट यांच्या म्हणण्यानुसार, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा बहुधा आधीच संपला आहे. जेवढे व्हायचे होते तेवढे नुकसान झाले आहे, आता परिस्थिती हळूहळू सुधारेल. एक मुलाखती दरम्यान ते म्हणाले कि, “वास्तविक परिस्थिती इतकी भीतीदायक नाही, जितकी दाखवली जात आहे.’,दरम्यान, सर्वत्र भीती व चिंतेच्या वातावरणात लेविट यांचे हे विधान खूप दिलासादायक आहे. तसेच त्यांचे हे विधान महत्वपूर्ण देखील आहे कारण, चीनमधील कोरोना विषाणूपासून बरे होण्याबाबतचा त्यांचा अंदाज सिद्ध झाला आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञ दावा करीत होते की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल, परंतु लेविट यांनी याचे अचूक मूल्यांकन केले होते.

लेविट यांनी फेब्रुवारी महिन्यात लिहिले की दररोज कोरोनाची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. हे सिद्ध करते की, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पुढील आठवड्यात कमी होऊ शकेल. त्याच्या अंदाजानुसार मृत्यूची संख्या रोज कमी होऊ लागली. जगाच्या अंदाजापेक्षा चीन लवकरच आपल्या पायावर उभा राहिला. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर कोरोना विषाणूचा सर्वाधिक त्रास होणारा हुबेई प्रांतही उघडणार आहे. वास्तविक, लेवीट यांनी चीनमध्ये कोरोनामुळे 3250 मृत्यू आणि 80,000 प्रकरणांचा अंदाज लावला होता, तर बाकीचे तज्ञ लाखोंचा आकडा मोजत होते. मंगळवारपर्यंत चीनमध्ये 3277 मृत्यू आणि 81171 प्रकरणे समोर आली आहेत.

आता संपूर्ण जगभरातही लेविट चीनचा ट्रेंड पाहत आहे. दररोज 50 नवीन प्रकरणे येत असलेल्या 78 देशांच्या आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे ते म्हणतात की बहुतेक ठिकाणी बरे होण्याची चिन्हे आहेत. त्यांची गणना प्रत्येक देशात कोरोना विषाणूच्या एकूण प्रकरणांवर आधारित नसून दररोज येणाऱ्या नवीन प्रकरणांवर आधारित आहे. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन प्रकरणांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे लेविट यांचे म्हणणे आहे.

ते म्हणतात की, ही आकडेवारी अद्याप त्रासदायक आहे परंतु वाढ कमी होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. तसेच ही आकडेवारी वेगळीही असू शकते आणि बर्‍याच देशांमध्ये अधिकृत डेटा खूपच कमी आहे कारण चाचणी कमी होत आहे. दरम्यान, त्यांचा विश्वास आहे कि, हि अपूर्ण आकडेवारी असूनही, सतत घसरण होत आहे याचाच अर्थ असा कि, काहीतरी आहे जे कार्यरत आहे. त्याच्या या निष्कर्षामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी आशा निर्माण झाली आहे. लेव्हीट सर्व देशांमध्ये कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्याच्या महत्त्वपूर्णतेवर देखील जोर देतात.

लेविट यांच्या मते, सामाजिक अंतर सर्वात महत्वाचे आहे, विशेषत: हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की, मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ नये. कारण हा विषाणू इतका नवीन आहे की बहुतेक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी याच्याशी लढण्याची इम्युनिटी नाही आणि लस तयार करण्यासाठी अद्याप काही महिने लागतील. तसेच ते पुढे म्हणाले कि, ध्येय गाठण्यासाठी केवळ चाचणीच नव्हे तर सुरुवात पासूनच शरीर तापमान नियंत्रणाद्वारे देखील ओळखणे फार महत्वाचे आहे . ज्याची चीन स्वत: अंमलबजावणी करीत आहे आणि सुरुवाती पासूनच सोशल आयसोलेशन करीत आहे.

लेविट यांच्या या गोष्टी दिलासादायक आहेत. 2013 मध्ये रसायनशास्त्राच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवलेले लेविट हे जग संपुष्टात येणार असल्याचे अनेक शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ञांनी केलेली भविष्यवाणी नाकारत आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मंद आर्थिक प्रगतीबद्दल लेविट सर्वाधिक चिंतित आहेत. जगभरातील आर्थिक क्रियाकलाप ठप्प झाले आहेत आणि उत्पादन मंदावले आहे. लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील लोकांना सर्वाधिक त्रास झाला आहे.