व्हेंटिलेटर काढल्यानंतर कोरोनाग्रस्तानं गर्लफ्रेंन्डला घातली लग्नाची मागणी, पुढं झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोनाची दहशत असली, तरी प्रेम संपलेले नाही. उलट अशा भयंकर परिस्थितीतही प्रेम फुलताना दिसत आहे. अशीच एक लव्ह स्टोरी लंडनध्ये बहरली आहे. कोरोना व्हायरसमुळे गंभीर अवस्थेत असलेला रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्याने सर्वात आधी त्याने गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करुन थेट लग्नासाठी प्रपोज केले आहे.

कोरोना रुग्णांची प्रकृती खूप गंभीर होती. त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्याला वेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णाने सर्वात आधी पहिला कॉल गर्लफ्रेंडला केला. व्हिडिओ कॉल करून त्याने थेट लग्नासाठी विचारणा केली. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला लगेच होकार दिला. त्यामुळे फक्त त्या रुग्णालाच नव्हे तर इतर कर्मचार्‍यांनाही आनंद झाला. लंडनच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती असेलल्या रुग्णांना टॅब देण्यात आले आहेत. जेणेकरून या रुग्णांना आपल्या प्रियजनांना पाहता येईल, त्यांना व्हर्च्युअल भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. मात्रा, संबंधित तरुणाने कुटुंबाला संपर्क न करता गर्लफ्रेंडला फोन लावला आणि तिला थेट लग्नासाठी प्रपोज केले आहे.