Coronavirus : कोरोनाचा ‘हाहाकार’ ! ‘महामारी’ची भारतात एका दिवसात 55 जणांना ‘लागण’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना महामारीचे संकट दिवेंसदिवस गडद होत चालले आहे. त्यामुळे
भारतात एका दिवसात तब्बल 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरे लॉकडाऊनच्या दिशेने जात आहेत. मागील 8 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मज्जीत, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

देशातील विविध राज्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढत आहे. देशात 13 मार्चला रुग्णांची संख्या 89 होती. त्यानंतर अवघ्या 24 तासांत ही संख्या 96 पर्यंत पोहचली होती. कोरानामुळे मेटृो शहरांमध्ये सरकारी वाहतूक वगळता दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54 हून अधिक आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्ह्याधिकार्‍यांनी घेतला आहे.