व्हिटॅमिन-D चं प्रमाण ‘मुबलक’ असेल तर ‘कोरोना’मुळं होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी, अभ्यासातून माहिती आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्याच्या शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण अधिक आहे अशा रुग्णांना कोरोना विषाणूमुळे मृत्यूची जोखीम 52% कमी आहे. एका नव्या अभ्यासात ही माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

संशोधकांना अशी माहिती मिळाली आहे की ज्या रूग्णांमध्ये व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात होते, अशा रुग्णांचे रूग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर, व्हिटॅमिन डीमुळे गंभीर आजारी पडण्याचा धोकाही 13 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.

अभ्यासादरम्यान असे आढळले की ज्या रुग्णांमध्ये अधिक व्हिटॅमिन डी असते त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज देखील 46 टक्क्यांनी घटली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये व्हिटॅमिन डी महत्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे कोरोना रुग्णांना फायदा होतो.

अमेरिकेत सरासरी 42 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे आढळून आले आहेत. त्याच वेळी, वृद्ध लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची तुलनात्मकदृष्ट्या अधिक कमतरता दिसून आली आणि असे लोक देखील कोरोनाचा बळी बनत आहेत.

यापूर्वी बोस्टन युनिव्हर्सिटीच्या मायकेल हॅलिकने एका संशोधनात असे शोधले होते की ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते, अशा लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका 54 टक्के कमी असतो.

शास्त्रज्ञांना कोरोना रुग्ण आणि व्हिटॅमिन डी यांच्यातील संबंधांबद्दल नवीन माहिती मिळाली. या टीमने तेहरानच्या रुग्णालयात 235 कोरोना रुग्णांचे नमुने घेतले. 67 टक्के रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण 30 ng/ml पेक्षा कमी होते.

तज्ञांचे म्हणणे आहे की इतर रोगांशी झगडणाऱ्या लोकांमध्येही व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असेल तर त्यांना धोका अधिक असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीचे योग्य प्रमाण असणे महत्वाचे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like