Coronavirus : कोरोना गो ! आजारावर मात करणाऱ्या ‘तिनं’ सांगितला ‘अनुभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. जवळपास 100 देशांवर कोरोनाचे सावट असून 1 लाख जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातही अनेकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यातील एका कोरोनाग्रस्त रुग्णाने उपचारानंतर आपला अनुभव शेअर केला आहे. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या एका महिलेची फेसबूक पोस्ट सध्या बरीच चर्चेला विषय ठरली आहे.

कोरोना संसर्ग झाल्याने वाढत जाणारी रुग्णांची संख्या, मृत्यांची संख्या यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हीच भीती कमी करण्यासाठी या सिएटल येथील एलिझाबेथ स्कोनिडरने आपला अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. ताप येण्याच्या आदल्या रात्री आपण एका छोट्या पार्टीला गेल्याची आठवण तिने सांगितली. यापार्टीत सर्वांची परिस्थिती उत्तम होती. त्यात असलेल्या कोणालाही खोकला, ताप, सर्दी नव्हती. परंतु त्यानंतरच्या तीन दिवसात पार्टीत गेलेल्या 40 टक्के लोकांना सर्दी, ताप, खोकला झाला. माध्यमांमध्ये देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार मी सतत माझे हात स्वच्छ ठेवत होते. खबरदारी घेत होते, हस्तांदोलन टाळत होते.

वयोमानानुसार आजाराची लक्षणं आढळली असल्याचे निरीक्षण एलिझाबेथने नोंदवले. पहिल्या दिवशी मला 103 अंश सेल्सियस ताप होता. दुसऱ्या दिवशी ताप कमी झाला. एका दिवस मला सर्दी देखील झाली आणि एका नाकपुडीने श्वास घेता येत नव्हता. आमच्यातील काही जणांना देखील श्वास घेण्याची समस्या येत होती. आजारपण हे 10 ते 16 दिवसांचे असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर माझी सिएटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करुन आजारापासून बरी झाल्याचे एलिझाबेथने फेसबूकवर म्हणले.

कोरोना आजारापासून बरे होता येईल. कोणताही आजार अंगावर काढण्याऐवजी डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची आवश्यकता आहे. कोरोना बाबत भीती न बाळगण्याचे तिने सर्वांना आवाहन केले आहे.