लोक कोरोनामुळे मरताहेत अन् HM अमित शाह यांचे चिरंजीव आयपीएल खेळवताहेत; KRK ची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. मात्र, तरीही देशात IPL स्पर्धा खेळवली जात आहे. त्यावरून अभिनेता कमाल आर. खान याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ‘लोक कोरोनामुळे मरताहेत आणि अमित शाह यांचे चिरंजीव आयपीएल खेळवताहेत’, असे त्याने म्हटले आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1384004683669204996

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता कमाल खान याने अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्याने ट्विट करून यावर भाष्य केले. त्यामध्ये म्हटले, की ‘आज देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. लोक रस्त्यांवर उपचारांविना मरत आहेत. अशा परिस्थितीत अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि नालायक क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यात गुंग आहेत’.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1384371254845591552

तसेच स्मशानात लाकडं नाहीत. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनही नाही. इतकेच नाही की रुग्णालयही रिकामे नाही. खाजगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी तीन लाख ऍडव्हान्स द्या. यामध्ये मृत्यू झाला तर मृतदेहासाठी दोन लाख भरा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असेही म्हटले आहे.

कुंभमेळ्यावरूनही

तुम्ही कधी अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांच्यापैकी कोणी कुंभमेळ्यात गेलेला पाहिलाय का? कुणीच नाही. केवळ गरीब लोक आपली पापे धुण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. आता कोरोना कोणाला झाला गरीबांनाच ना. मेले कोण गरीबच. म्हणजेच सर्व संकटांचा ठेका गरीबांनीच घेतलेला आहे, अशा शब्दांत त्याने कुंभमेळातील उपस्थितीवरून भाष्य केले.