Coronavirus : मुंबई-पुण्यासह राज्यात ‘कोरोना’चं ‘थैमान’, कुठं आहेत पुण्याचे पालकमंत्री ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. विशेषतः पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक रुग्ण बाधित आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी नायडू रुग्णालयात जाऊन कोरोना बाधितांना धीर दिला आहे. दुसरीकडे मात्र, पुणे अन् पिंपरी-चिंचवडची अशी परिस्थिती असताना पालकमंत्री अजित पवार कुठंही दिसत नाहीत अशी कुजबूज राजकीय वुर्तळामध्ये होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर पवारांचे विशेष लक्ष असते. मात्र, मागील १० दिवसांपासून दोन्ही शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही पालकमंत्री अजित पवार पुण्यात कोणाची माहिती घेताना दिसले नाहीत. इतरवेळी राजकिय व्यस्त कार्यक्रमात पवार वेळात वेळ काढून पुण्याची बित्तंम बातमी जाणून घेत असतात. मात्र, कोरोनाचा कहर असताना विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात व्हायरस फोफावत असतानाही अजित पवार यांनी पुण्यात एकदाही भेट दिली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबतची चर्चा होत आहे.