Coronavirus : ‘वॉर्निंग’ दिल्यानंतर देखील ‘चार्टर्ड’ विमानानं गेले फिरायला, परतल्यानंतर 44 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २० पेक्षा थोडे जास्त वय असलेले जवळजवळ ७० तरुण कोरोना व्हायरसची चेतावणी दिल्यानंतरही फिरायला गेले. परतल्यानंतर त्यांच्यातील ४४ लोकं कोरोना पॉजिटीव्ह आढळले. ही घटना अमेरिकेच्या टेक्सास येथील आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, तब्बल दोन आठवड्यांपूर्वी १० लोकांपेक्षा अधिक लोकांनी समूहाने जमा न होण्याचा सल्ला दिला गेला होता. लोकांना आवाहन केले होते की, अनावश्यक प्रवास करू नये. पण तरुणांच्या या समूहाने या सूचनांकडे दुर्लक्ष केले.

मेक्सिकोमध्ये सुट्ट्या घालवल्यानंतर कोरोना पॉजिटीव्ह आढळलेले सगळे ४४ तरुण टेक्सास युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी चार्टर्ड प्लेनने प्रवास केला होता.

टेक्सासचे स्पीकर डेनिस बोनन यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हा आपल्याशी संबंधित मुद्दा नसला तरी तो प्रत्यक्षात आहे. तुम्हाला वाटत असेल की, याचा आपल्यावर परिणाम होणार नाही, परंतु प्रत्यक्षात ते होईल. जर महाविद्यालयीन विद्यार्थी मेक्सिकोमध्ये सुट्ट्या घालवत असतील तर त्याचा परिणाम जास्त लोकांवर होत आहे.

चार्टर्ड प्लेनने मेक्सिकोला पोहोचल्यानंतर घरी परत येताना काही विद्यार्थ्यांनी कमर्शियल फ्लाइट मध्येही प्रवास केला होता. आता अधिकाऱ्यांना भीती वाटत आहे की, कमर्शियल फ्लाइटमध्ये प्रवास करणारे लोकदेखील संक्रमित असू शकतात.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित विद्यार्थ्यांसह प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. WHO ने असेही म्हटले कि तरुण कोरोनापासून वाचू शकत नाहीत. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे बर्‍याच तरुणांच्या मृत्यूच्या बातम्याही आल्या आहेत.

टेक्सास विद्यापीठाने अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व या इशाऱ्यांना गांभीर्याने घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. त्याच वेळी, पॉजिटीव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांना सेल्फ आयजोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.