कोरोना बाधीत राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी PM-CARES ची ‘ही’ आहे मोठी योजना, जाणून घ्या

नवी दिल्ली: वृत्तसंस्था- कोरोनामुळे देशात मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. बेड्स आणि ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या संकटावर मात करण्यासाठी सरकारने हे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ५० हजार मॅट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने आता ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असलेल्या १२ राज्यांची गणना करण्यास सुरवात केली आहे.

माहितीनुसार, PM-CARES फंड अंतर्गत, देशात १०० नवीन रुग्णालये बांधली जात आहेत. ज्यामध्ये ऑक्सिजन प्लांट असतील. दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या EG२ च्या बैठकीत अनिवार्य वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची उपलब्धता यावर चर्चा झाली.

बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले, त्यातील सर्वात जास्त प्रभावी असलेल्या पहिल्या १२ राज्यांत ऑक्सिजन उपलब्ध होईल. गंभीर कोरोना ग्रास्तांचे जीवन वाचविण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजन असणे फार आवश्यक आहे. ही अशी राज्ये आहेत ज्याठिकाणी कोरोनाचा तांडव माजला आहे.
महाराष्ट्र
गुजरात
उत्तर प्रदेश
दिल्ली
छत्तीसगड
कर्नाटक
मध्य प्रदेश
केरळ
तामिळनाडू
पंजाब
हरियाणा
राजस्थान

भारतात आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या रुग्णांची संख्या १,४०,७४,५६४ झाली आहे. याशिवाय, गेल्या २४ तासांत देशात १,०३८ या संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. यासोबत देशात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची एकूण संख्या १,७३,१२३ झाली आहे.