‘कोरोना’वर मात करण्यासाठी PM मोदींनी दिला 72 तासांचा ‘फॉर्म्युला’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना संक्रमण आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जून महिन्यानंतर या दहा राज्यात वेगाने वाढला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान ?
कोरोनाचे अॅक्टिव्ह केस 6 लाखाहून अधिक आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे या 10 राज्यांमध्ये असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोना विरुद्धच्या लढाईत या 10 राज्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
80 टक्के कोरोनाचे रुग्ण या 10 राज्यांमधील आहेत.
ज्या राज्यांमध्ये टेस्टिंग रेट कमी आहे तिथे सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. त्यामुळे टेस्ट करण्याची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात राज्यांना अजूनही टेस्टची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे समोर आलं आहे.
देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत आधीही कमी होतं आणि आताही कमी आहे.