Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान PM मोदींनी शेअर केला 3D व्हिडीओ, लोकांना योगा करण्याचं केलं ‘आवाहन’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी जीवनात योगाला महत्व देतात. त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे कि स्वतःला फिट ठेवण्याचा एकमात्र उपाय योगा असून कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन केले असल्याने मोदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा करत आहेत.

त्यांनी योगा करतानाचे काही व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. फिटनेस बाबत एक व्हिडिओ टाकत त्यांनी सांगितले आहे की, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते कोणता योगा करतात. सोबतच त्यांनी लोकांना फिट राहण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला आहे.

मोदींनी सोमवारी ट्विटरवर थ्री डी एनिमेटेड व्हिडिओ टाकला आणि म्हटले, “रविवारी ‘मन की बात’ दरम्यान कोणीतरी माझ्या फिटनेसबाबत विचारले होते. आज मी योगा व्हिडिओला सादर करण्याचा विचार केला.” त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मला आशा आहे कि तुम्ही पण नियमितपणे योगा करायला सुरुवात कराल. मी नाही एक फिटनेस तज्ञ आहे आणि नाही वैद्यकीय तज्ञ. योगा करणे अनेक वर्षांपासून माझ्या जीवनाचा भाग आहे.” ते म्हणाले कि त्यांना खात्री आहे कि काही लोकांकडे फिट राहण्याचे इतर पर्यायही आहेत, जे त्यांनी दुसऱ्यांनाही सांगितले पाहिजे.

रविवारी, ‘मन की बात’ या कार्यक्रमा दरम्यान एका श्रोत्याने पंतप्रधानांना विचारले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान तुम्ही काय करता आणि तंदुरुस्तीची काळजी कशी घेता? यावर मोदींनी योगाचा संदर्भ देताना सांगितले की, ते आपल्या योगाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतील. सामान्य लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो.