Coronavirus : देशात ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! रुग्णांची संख्या 300 वर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. भारतातही या व्हायरसने खळबळ उडाली आहे. सर्व राज्य सरकार सामान्य लोकांना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यात बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिच्या दुर्लक्षाचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर शुक्रवारी कनिका कपूरविरूद्ध लखनऊमधील सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी देशाच्या विविध भागात कोरोनाव्हायरस संसर्गाची 50 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 250 झाली होती. तर शनिवारी दुपारपर्यंत ही संख्या वाढून 300 झाली. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात येणार्‍या 6700 हून अधिक लोकांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, देशात कोविड -19 संसर्ग झालेल्यांमध्ये 32 परदेशी लोक आहेत, ज्यात 17 इटालियन, तीन फिलीपाईन, दोन ब्रिटन व एक- एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील आहेत. यात आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्रातील चार मृत्यूंचा समावेश आहे.