Coronavirus : छातीवर प्रचंड ‘ओझं’ असल्यासारखं वाटत होतं, कोरोनाग्रस्त युवतीनं शेअर केला ‘अनुभव’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसची भीती अनेकांच्या मनात आहे. साधा खोकला, ताप आणि सर्दी झाली तरी अनेकांच्या मनात पाल चुकचुकत आहे. त्यापार्श्वभूमीवर कोरोनाचा नेमका त्रास काय होतो. यासंदर्भात कोरोनाग्रस्त ट्विटर युझरने तरुणीने अनुभव शेअर केला आहे.

22 वर्षांच्या बिजोंडा हलीतीला कोरोना व्हायरस झाला आहे. कोरोना व्हायरसबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याबाबत लोकांच्या मनात गैरसमज राहू नयेत, यासाठी त्यांनी ट्विटरवर अनुभव शेअर करीत लोकांच्या मनातील भीतीही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बिजोंडाने अगदी तिला झालेला कोरडा खोकला ते कोरोना व्हायरसचे निदानापर्यंत प्रत्येक दिवस तिचा कसा होता, हे सांगितले आहे.

पहिला दिवस – सुरुवातील कोरडा खोकला होता, घशात थोडीशी खवखव वाटत होती. शिवाय थकवाही होता.

दुसरा दिवस – डोकं जड झाले होते. सोबतच थंडी आणि तापही होता. सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्यांमध्ये वेदना आणि तोंडात कडवट चव होती.

तिसरा दिवस – तिसरा संपूर्ण दिवस बजोंडाने झोपून काढला कारण तिची शारीरिक शक्ती कमी झाली होती आणि ताप खूप वाढला होता. सोबतच कोरडा खोकला, तीव्र डोकेदुखी, थंडी लागण आणि भीतीही वाटत होती. बजोंडा डॉक्टरकडे गेली. त्यावेळी तिला फ्लू किंवा स्ट्रेप असे काही नसल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला.

चौथा दिवस – चार दिवसांनी बजोंडाचा ताप पूर्णपणे गेला, मात्र इतर लक्षणे दिसून आली. श्वास घेण्यात समस्या जाणवू लागली. बजोंडा म्हणाली, मला माझ्या छातीवर एक मोठा दगड ठेवल्यासारखे वाटत होते.
शेवटी कोरोनाव्हायरस टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बंदिस्तही करून घेतले. रिपोर्टची प्रतीक्षा केली आणि कोरोनाव्हायरस असल्याचे निदान झाले. शिवाय एका विशिष्ट गटाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असं सांगितलं जातं. मात्र 22 वर्षांच्या बीजोंडाने आपल्याला दुसरा कोणताही आजार नाही, धूम्रपान करत नसल्याचंही तिने स्पष्ट केले.बीजोंडावर उपचार सुरू असून, तिची तब्येत आता सुधारते आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवावे असे तिने आवाहन केले आहे.