धक्कादायक ! सातार्‍यात ‘कोरोना’ रुग्णासोबत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, 8 जणांवर FIR

 पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचे थैमाने वेगाने वाढले असून लॉकडाउन असतानाही अनेकांकडून नियमांना पायदळी तुडविले जात आहे.सातार्‍यातील कराड तालुक्यात कोरोना रुग्णसाबोतच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही कराडमध्ये पाच जणांपेक्षा जास्त लोक एकत्र आले होते. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारुग्ण तांबवे गावचा रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईतून गावी गेला होता. यावेळी त्याने अनेक जणांची भेट घेतली होती.

प्रशासनाकडून यासंबंधी माहिती घेतली जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णाने चाकुर्डी येथील नातेवाईकाच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तलाठीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आठ नातेवाईकांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या सर्वांची वैद्यकीय तपासणी केला जात असून सर्वांना क्वारंटाइन होण्यासाठी सांगण्यात आले आहे.