Mumbai : रेमडेसिवीरची चोरी करणारा जाळ्यात सापडल्यानंतर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलिसांना ‘आव्हान’ देत फरार झाला क्वारंटाईन सेंटरमधून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई बोरिवली येथील परिसरात एका चोराने प्रत्येक मेडिकलमधून रेमेडिसिवीर इंजेक्शन चोरले होते. त्यावरून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली होती. नंतर त्या चोराला कांदिवली येथील क्वांरटाईन सेंटरमध्ये
ठेवण्यात आले. यावरून मी येथून २ दिवसांत पळून जाईन, असे स्पष्ट पोलिसांनांच त्यानं आव्हान केलं होते. आणि तो पसार सुद्धा झाला होता.

याबाबत अधिक माहितीनुसार, करीम शाबुल्ला खान (वय, २४) असे त्या चोरांचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी बोरिवली परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी करताना याला बेड्या ठोकल्या होत्या. चोर करीमने बोरिवलीतील जवळपास डझनभर मेडिकल्समधून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केली होती. तपासणीनंतर तो चोर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. म्हणून, या चोराची रवानगी कांदिवली पश्चिमेला असणाऱ्या साईनगरमध्ये असणाऱ्या क्वांरटाईन सेंटरमध्ये करण्यात आली होती. त्यावेळी मी येथून २ दिवसांत पळून जाईन, म्हणत हा चोर क्वारंटाईन सेंटरमधील खिडकीच्या जाळ्या कापून फरारही झाला होता.

दरम्यान, हा चोर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमधून पळाला होता. क्वारंटाईन सेंटरमधून पळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र २४ तासातच ओशिवरा परिसरातून त्याला ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले आहे.