Coronavirus Impact : ‘कोरोना’ग्रस्त महिला बीचवर करीत होती ‘एन्जॉय’, पकडली गेल्यावर लोक चांगलेच ‘भडकले’

सिडनी : वृत्तसंस्था – एका ३६ वर्षीय महिलेवर लोक चांगलेच भडकले. भडकण्याचे कारणही तसेच आहे. कारण ही महिला कोरोना व्हायरसची पॉझिटिव्ह रुग्ण असताना देखील बीच वर सुट्टी घालवण्यासाठी आली होती. जेव्हा या महिलेची कोरोना टेस्ट झाली होती तेव्हा ती ऑस्ट्रेलिया मधील सिडनी मध्ये होती.

कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर शुक्रवारी ती क्वीन्सलँडमधील हॅमिल्टन बीचवर रवाना झाली. ही महिला मूळची युकेची आहे. हॅमिल्टन बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यामुळे संक्रमित महिला तेथे जाण्यामुळे इतर लोकांना धोका निर्माण झाला.

हॅमिल्टन आयलँडच्या प्रवक्त्याने घटनेची पुष्टी केली. त्याच वेळी, कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर, त्या महिलेला स्पष्टपणे सांगितले गेले की तिला स्वत:ला वेगळं करण्याची गरज आहे

नंतर न्यू साउथ वेल्समधील अधिकाऱ्यांनी क्वीन्सलँडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्या महिलेचा शोध घेण्यात आला. डेली मेलच्या वृत्तानुसार, रविवारी ही महिला बीचवर पकडली गेली.

या महिलेने बेटावर एक रात्र आयसोलेशन मध्ये काढली. परंतु त्यानंतर नावेने प्रवास करून महिला मैके नावाच्या भागात गेली होती. तेथील अधिकाऱ्यांनी नंतर या महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती केले. तथपि महिलेने आपल्या बचावात सांगितले की, अधिकाऱ्यांचे निर्देश तिला समजले नाहीत. म्हणून ती सुट्टी घालवण्यासाठी बेटावर आली होती.