Coronavirus : लक्षणं दिसण्याची अन् टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची वाट पाहू नका, कोरोनापासून दूर राहण्यासाठी ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर लोक स्वतःला आयसोलेट करत होती. मात्र आता लक्षणे जाणवत नसली तरी कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या माध्यमातून सिक्रमण होऊ शकत. त्याचबरोबर घरातच आयसोलेट होणाऱ्या अशा व्यक्तींकडूनही इतर सदस्यांना संक्रमण होऊ शकते. त्यामुळे घरात राहून काही प्रोटोकॉल्सचं पालन करायला हवं. तरच तुमच्यासह कुटुंबातील इतर व्यक्तीही निरोगी राहू शकतील. घरात साफ सफाई सतत करत राहायला हवी. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात ठेवायला हवा.

जेव्हा लोक एकत्रित राहत असतील तर जास्त खबरदारी घायला हवी. सतत हात, पाय आणि तोंड धुवत राहावे. लाईट्सचे, फॅनचे बटणं सॅनिटाईज करत राहायला हवं. एकमेकांच्या उष्ट्या भांड्यात खाऊ नये. वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना तसेच लहान मुलांना घरबाहेर पाठवू नये. सर्वांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यायला हवं.

जर कोणी एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आला तर १४ दिवस वेगळ राहा. वेगळं बाथरूम वापरा. एकच खोली असेल तर मोठा पडदा लावून घ्या आणि दोन भाग पाडा. नाष्ता वेळेवर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहारात  सगळ्या पोषक घटकांचा समावेश करावा.

WHO नं या संदर्भात काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याही आपण जाणून घेऊ.

आहारात गुड फॅट्स असलेल्याचा समावेश करा. अवॅकाडो, फिश, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला, नारळ, चीज, तूप, मलई आदीमध्ये गुड फॅट्स आढळते. त्याचबोर्बर महहत्तवाची गोष्ट म्हणजे मोठाच सेवन कमी करणे. जास्त प्रमाणात मीठ वापरतात ते लोक लवकर आजारी पडतात.

त्यामुळे दिवसाला 5 ग्रॅम पर्यंत मीठाचे सेवन मर्यादित ठेवणे चांगले. शरीराचे तापमानही नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना दररोज ८-१० ग्लास पाणी पिण्यास सांगितले आहे. शक्यतो पेयांमध्ये साखरेचे सेवन करणे टाळने विशेष पॅकेड फळे आणि भाज्या वापरताना, लेबलवर साखर आणि मीठाचे प्रमाण वाचण्याची खात्री करावी.

निरोगी जीवनशैलीमुळे कोरोनाला नक्कीच आपण दूर ठेऊ शकतो. व्यायाम, ध्यान आणि पुरेशी झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल. लोकांच्या संपर्कात येण्यापासून वाचण्यासाठी घरी रहा आणि संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करा. मांसाहारी पदार्थांचा अधून मधून आहारात समावेश करा.
संपूर्ण धान्य आणि ड्रायफ्रुट्स विषाणू विरूद्धच्या लढाईत शक्तिशाली असल्याचं डब्लूएचओ मान्य केलं आहे. त्यांच्या मते, जर कोणी १८० ग्रॅम धान्य, ओट्स, गहू, बाजरी, ब्राऊन राईस किंवा बटाटे खाल्ले तर त्याला संसर्गापासून वाचवले जाईल. याशिवाय आहारात फळे आणि भाज्या व्यतिरिक्त, बदाम, नारळ, पिस्ता सारख्या काजूंचा समावेश करण्यास सूचविले आहे.

दुसरया लाटेत संक्रमणाचा वेग जास्त आहे. तो टाळण्यासाठी पेरू, सफरचंद, केळी, , द्राक्षे, अननस, पपई, सारखी फळे खावीत. तेच हिरव्या भाज्या, लसूण, आले, धणे, हिरव्या मिरच्या, ब्रोकोली, शेंगा खाव्यात. शक्यतो साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांपेक्षा ताजी फळे आणि कच्च्या भाज्यांचा सेवनावर जास्त भर द्यावा जेणे करून रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.