Coronavirus : स्वतःचा ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी ‘या’ 5 चूका करताहेत लोक, नाही केली सुधारणा तर महामारी करेल ‘घात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरसचा प्रभाव कोणत्याही प्रकारे कमी होताना दिसत नाही. चीनमधून बाहेर पडलेल्या या व्हायरसने लाखो लोकांचा जीव घेतला आहे. तो घातक आहेच, शिवाय लोकांची मानसिक शांततासुद्धा भंग करत आहे.

सध्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टर एक संभाव्य उपचार शोधण्याच्या दिशेने काम करत आहेत. लोक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी विविध आवश्यक खबरदारीचे उपाय करत आहेत.

कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि अन्य पद्धती अवलंबणे जरूरी आहे. परंतु काही लोक हे उपाय योग्य पद्धतीने करत नसल्याचे दिसत आहे, ज्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही अशा चूकांबाबत सांगणार आहोत, ज्या चूका लोक कोरोनापासून वाचण्यासाठी नकळत करतात.

हे समजणे की घरात सुरक्षित

अनेक लोकांना वाटते की, ते घरात आहेत तर सुरक्षित आहेत. मात्र, घरात राहाणे व्हायरसपासून वाचण्याची एक पद्धत आहे. या गोष्टीची काहीही गॅरंटी नाही की, तुम्ही सुरक्षित आहात. खासकरून घरात एखादी संक्रमित व्यक्ती असेल. आजारी व्यक्तींसोबत राहाणे आणि जेथे व्हेंटीलेशन नाही, अशा ठिकाणी राहाणे धोकायदाय आहे.

बाहेर जात नाही, पण घरात गर्दी

महामारी दरम्यान अनेक लोकांनी घरात कोंडून घेतले आहे, जी एक चांगली गोष्ट आहे. मात्र, हे लोक बाहेर जात नसले तरी घरी गर्दी जमवून पार्टी करत आहेत. यामुळे व्हायरसचा धोका वाढत आहे. मात्र, अशी कोणतीही पद्धत नाही की तुम्ही पाहू शकता की, तुमचे मित्र आणि आप्तेष्ट तुमच्या संपर्कात येण्यापूर्वी कुठे होते, तुम्ही हे ठरवू शकत नाही की त्यांच्यासोबत राहाणे सुरक्षित आहे.

लॉकडाऊन उघडणे म्हणजे धोका टळला

लोकांची सर्वात मोठी चूक ही आहे की, त्यांना वाटते आता कुठेही जाण्यासाठी स्वातंत्र्य आहे, यासाठी लॉकडाऊन खुले करण्यात आले आहे. स्थानिक रेस्टॉरंट किंवा आजूबाजूचे मॉल, थिएटर उघडले आहेत ते अर्थव्यवस्थेच्या कारणामुळे, यासाठी नाही की ते सुरक्षित आहेत.

बाहेरून येऊन स्वत:ला वेगळे न ठेवणे

तुम्ही अतिरिक्त लक्ष दिले असेल आणि व्यवसाय किंवा अन्य कार्यासाठी बाहेर राहण्याच्या दरम्यान सामाजिक अंतर ठेवले असेल, परंतु जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा आवश्यक आहे की, कमीत कमी दोन आठवडे स्वताला वेगळे ठेवले पाहिजे.

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर टेस्ट करा

एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर ताबडतोब टेस्ट करणे आवश्यक आहे. परंतु, पहिली गोष्ट म्हणजे स्वताला कही दिवसांसाठी वेगळे ठेवले पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित केले पाहिजे.