Coronavirus : काय सांगता ! होय, प्रिंस चार्ल्स आयुर्वेद उपचारांमुळंच ‘कोरोना’मुक्त झाले, केंद्रीय मंत्र्याचा दावा (व्हिडीओ)

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था  –   कोरोनाने जवळपास १२० देशांत थैमान घातले असून ९ लाखांपेक्षा जास्त जणांना या आजाराने ग्रासले आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिंस चार्ल्स यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, आयुर्वेदिक उपचारांच्या साहाय्याने प्रिन्स चार्ल्स ठणठणीत बरे झाले आहेत. असा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.

आयुष मंत्र्यांनी सांगितले कि, बंगळूर येथील ‘सौख्य’ रिसॉर्टचे आयुर्वेदिक डॉक्टर माथाईज हे ब्रिटनमध्ये प्रिन्स चार्ल्स त्यांच्यावर उपचार करीत होते. त्यानीच ही माहिती आपल्याला दिली. तसेच, कोविड -१९ वर आयुर्वेद व होमियोपथी उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी कृती दलाची नियुक्त करण्यात आल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरोना संक्रमितांच्या वाढत्या आकडेवाडीत गोव्यावरून कोरोना व्हायरसचे संकट दूर होताना दिसत आहे. देशभरात करोना व्हायरसची प्रकरणे नव्याने आढळून आलेली असली तरी तो नियंत्रणात आल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या लढाईत संरक्षण मंत्रालयाने अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावली, ज्यात लष्कराची 9 हजार खाटांची इस्पितळे असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत संरक्षण पीएसयूतून ४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच आज देशात कोरोना व्हायरसमुळे ६० जणांचा मृत्यू झाल्याची खंत आहेच, परंतु हे संकट आता कमी होत असल्याचे श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले.