ऑनलाईन क्लास दरम्यान प्रोफेसरची तब्येत बिघडली, ‘कोरोना’मुळे मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – व्हिडीओ मीटिंग अँप झूमवर क्लास घेत असताना एका प्रोफेसरची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. प्रोफेसरला कोरोनाची लागण झाली होती आणि कफचा त्रास सुरु असताना देखील ती क्लास घेत होती.

ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक या प्रोफेसरची तब्येत बिघडली ते पाहून विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिका पाठवण्यासाठी त्यांच्या घरचा पत्ता विचारला तेव्हा ती काहीच सांगू शकली नाही.

ही घटना अर्जेंटिना मधील आहे. बुधवारी एका महिला प्रोफेसरचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. ऑनलाईन क्लास सुरु असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होत होता. पाओला डी सिमोने नावाच्या या प्रोफेसरचं वय 46 वर्षे होतं.

या प्रोफेसरने याआधी एक ट्विट करून सांगितलं होतं की, 4 आठवड्यानंतर देखील ती कोरोनातून बरी झाली नव्हती. तरीसुद्धा तिने मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला.

युनिव्हर्सिटीने प्रोफेसरच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की त्या 15 वर्षांपासून सरकार आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय शिकवत होत्या.