योगी सरकारचा मोठा निर्णय, सामान्य लोकांवर दाखल लॉकडाऊन उल्लंघनाची प्रकरणे मागे घेणार

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या साथीला सामोरे जाण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाउन लागू केले. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कठोर बंधने आणली गेली आणि त्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर तक्रारीदेखील लादल्या गेल्या. लॉकडाऊन उल्लंघन संबंधित प्रकरणांबाबत आता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी सरकार लॉकडाऊन उल्लंघन संबंधित खटले मागे घेणार आहे. तसेच व्यापाऱ्यांवरील काही दिवसांपूर्वी दाखल गुन्हे मागे घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमधील सुमारे अडीच लाख लोकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे यूपीमधील जवळपास अडीच दशलक्ष लोकांना न्यायालये आणि पोलिस ठाण्यांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही.

लॉकडाउन दरम्यान सर्व देशभर साथीच्या रोगासंर्दभात कायदा लागू होता. लॉकडाऊन उल्लंघन संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले होते. लॉकडाउन उल्लंघन संबंधित प्रकरणांमध्ये कोरोना प्रोटोकॉल तोडण्यासाठी आणि दाखल केलेली प्रकरणे मागे घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. यूपी सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. लोकांना पोलिस स्टेशन आणि कार्यालयाला भेट द्यावी लागणार नाही.

या निर्णयामुळे कोर्टावरील खटल्यांचा ओढा कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यूपी सरकारने ही प्रकरणे मागे घेण्याची घोषणा करणारे पहिले राज्य बनले आहे. कोरोना प्रोटोकॉल तोडण्याच्या आणि लॉकडाऊन उल्लंघनासंदर्भातील दावा मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना व व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.