Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! आतापर्यंचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, 24 तासात 25 जणांचा मृत्यू तर 266 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. पुण्यात तर अक्षरशः कोरोनाचा हाहाकार माजला आहे. गेल्या 24 तासात पुण्यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर नवे 266 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यांमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. आज समोर आलेली आकडेवारी ही आतापर्यंतची विक्रमी आकडेवारी आहे. दरम्यान, दिवसभरात 169 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात एकाच दिवसात 25 जणांचा कोरोनामुळं मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज आढळून आलेल्या 266 रूग्णांमध्ये ससूनमधील 6, नायडू हॉस्पीटलमधील 226 आणि इतर रूग्णालयातील 34 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 169 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल 4119 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 2331 आहे. त्यापैकी 165 रूग्ण हे क्रिटीकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 35 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 6795 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 25 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्यानं चिंताजनकस्थिती आहे. आतापर्यंत पुणे शहरात 344 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे तर शहरालगतच्या एकाचा मृत्यू झाला आहे.