Coronavirus : पुणे मनपाकडून आजपासून झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये 350 पथकांकडून तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं पुण्यात आतापर्यंत 80 बळी गेले आहेत. कोरेानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सुरवातीपासुनच युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. तरी देखील शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आता शहरातील झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये 350 अरोग्य पथकांकडून तपासणीची मोहिम सुरू केली आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे सांगितले असून या उपक्रमामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे. त्यांना रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार आणि इतर गंभीर आजार असतील अशा ज्येष्ठांची तसेच इतरांची तपासणी पथकांकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, संशयित आढळणार्‍यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत.