Coronavirus : पुण्याहून 350 किलोमीटर चालत पोहचला परभणीमध्ये, टेस्ट झाल्यानंतर निघाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. आपल्या गावी जाण्याची कोणतीही वाहतूक व्यवस्था नसल्याने कित्येकजण पायी चालत आपल्या गावी जात आहेत. अशाच प्रकारे पुणे ते परभणी 350 किलो मिटरचे अंतर पायी चालत गेलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा यामुळे परभणी जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे.

सिव्हील सर्जन डॉ. प्रकाश देके यांनी सांगितले की, पुण्याहून पायी जिल्ह्यात पोहचलेला 21 वर्षीय तरूण कोरोना संक्रमीत निघाला आहे. पुण्यापासून सुमारे 350 कीमी अंतर पायी चालत जिल्ह्यात पोहचल्यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्याला परभणीतील सिव्हील रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर त्यापासून परभणी जिल्हा त्यापासून दूर होता. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्हा आतापर्यंत सेफ झोनमध्ये होता. परंतु अचानक एका 21 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण पुणे येथून 15 दिवसांपूर्वी परभणीत चालत आला होता, अशी माहिती आहे. त्यामुळे इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला परभणी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.