Coronavirus : भारतात कोरोना व्हायरसची 41 प्रकरणे, कतारमध्ये प्रवेश बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत भारतात या विषाणूची 41 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि त्यामुळे सरकार सतर्क आहे. यामुळे कतारने आता अनेक देशांतील उड्डाणांवर बंदी घातली आहे, या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

सोमवारी कतार सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कतार एअरवेजकडून कोरोना विषाणूचा परिणाम झालेल्या देशांमधून कोणतीही व्यक्ती येत असल्यास त्यांचा प्रवास निलंबित करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात केवळ इटलीचे नाव देण्यात आले होते, परंतु आता काही नवीन देशांची नावे जोडली गेली आहेत.

बांग्लादेश, चीन, मिस्र, भारत, ईरान, इराक, लेबनान, नेपाल, पाकिस्तान, फिलिपींस, साउथ कोरिया, श्रीलंका, सीरिया, थायलंड या देशांकडून येणाऱ्या विमानांना कतारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे कतार प्रशासनाने म्हंटले आहे. या देशांसाठी व्हिसा, व्हिसा ऑन अराईव्हल, वर्क परमिट, तात्पुरत्या काळासाठी येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली आहे.

भारताने देखील जारी केली ट्रॅव्हल ऍडव्हायजरी

विशेष म्हणजे कतारप्रमाणेच भारतानेही कोरोना विषाणूबद्दल ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, जपान, इटलीसह काही कोरोनाची लागण झालेल्या देशांच्या आगमनासाठी व्हिसा, व्हिजा व अराईव्हल वर भारताने बंदी घातली आहे. याशिवाय विमानतळवर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांचा शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत भारतातील विमानतळावर 7 लाखाहून अधिक लोकांची तपासणी केली गेली आहे. भारतात कोरोनाची एकूण 41 प्रकरणे आढळली असून त्यापैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत. परंतु उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. जगातील 90 हून अधिक देश या विषाणूच्या विळख्यात आहेत. केवळ चीनमध्ये या विषाणूमुळे 3119 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो बाधित आहेत.

जम्मूमध्ये आणखी एक कोरोना संशयित रुग्ण

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. जम्मूहून सोमवारी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात इराणहून परत आलेली व्यक्ती आढळली आहे. जम्मूच्या मेडिकल कॉलेजमध्ये दोन जणांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे पॉजिटीव्ह आढळली आहेत. सोमवारी तीन वर्षाच्या मुलास सोमवारी कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागली.