Coronavirus : क्वारंटाईनमध्ये टायगर नव्हे तर ‘या’ व्यक्ती सोबत टाईम स्पेंड करतेय दिशा पाटनी ! (व्हिडीओ)

कोपोलीसनामा ऑनलाइन –ना व्हायरसमुळं प्रत्येकजण सध्या स्वत:ला घरात बंद करून घेताना दिसत आहे. स्वत:ला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जो तो हातभार लावत आहे. बी टाऊनमधील सर्वात चर्चित चेहऱ्यांपैकी एक दिशा पाटनी सध्या क्वारंटाईनमध्ये टाईम घालवत आहे. अनेकांना वाटत असेल की, ती तिचा कथित प्रियकर टायगर श्रॉफ सोबत असेल परंतु असे अजिबात नाही. सध्या दिशा टायगरची बहिण कृष्णासोबत आहे.

दिशा पाटनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशा कृष्णा श्रॉफ सोबत दिसत आहे. दोघीही टिकटॉक व्हिडीओ करताना दिसत आहेत. दिशा खूपच सुंदर दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर दिशानं व्हाईट टीशर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे. आपल्या लुकनंही दिशानं अटेंशन घेतलं आहे. दिशानं कपाळावर टिकली लावली आहे ज्यात ती खूपच क्युट वाटत आहे. दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B94ig88hR–/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/B-GxHxJpEpD/

https://www.instagram.com/p/B-GxGX3prjA/

https://www.instagram.com/p/B-GrhYXJ5kU/

https://www.instagram.com/p/B-GxE6WJ8BQ/