राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात हळूहळू कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. दररोज आढळणा-या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. मात्र असे असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या 6 जिल्ह्यांत अद्यापही पॉझिटिव्हिटीचे (positivity) प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळला नसल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

संबधित 6 जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अऩेकजण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहेत. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात कशी आणायची असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सरासरी 11 हजार 30 दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. 7 ते 13 जून दरम्यान राज्यात 77 हजार 211 रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी 30 मे ते 6 जूनदरम्यान 1 लाख 3 हजार 489 रुग्ण आढळले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या 14 हजार 784 असल्याचे समोर आले आहे.

20 पेक्षा अधिक जिल्ह्यातील जनजीवन पूर्ववत

दरम्यान राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे (Dr. Subhash Salunkhe) म्हणाले की, राज्यात 20 पेक्षा अधिक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बंध कठोर केले आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Coronavirus | raigad sindhudurg kolhapur satara ratnagiri pune discticts has threat corona medical experts warn

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप