Coronavirus : ‘मुंबईची इटली होणार’ असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलची CM ठाकरेंवर सडकून टीका !

पोलिसनामा ऑनलाइन –14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपणार आहे अशा गैरसमजातून परराज्यातील मजुरांचा मोठा गोंधळ पहायला मिळाला. मुंबईतील वांद्रा आणि ठाण्यातील मुंब्रा येथे या मजुरांची मोठी गर्दी झाली होती. सध्या देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्री मोदींनी केली होती. यामुळं सोशल डिस्टेंसिंग ठेवणं गरजेचं होतं. अशात मुंबई आणि ठाण्यातील या गर्दीमुळं भाजपनं राज्य सरकारवर टीका केली होती. यानंतर आता यात अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल हीदेखील पुढे आली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1250074397563650050

रंगोली चंदेल हिनं याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोरोनाची स्थिती हातळण्यावरून टीका केली होती. आता पुन्हा एकदा तिनं अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रंगोलीनं यांसदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणते, “मुंबईची दुसरी इटली होणार. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या सक्षण नेतृत्वाची गरज आहे.” असं रंगोली म्हणाली आहे.

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका

वांद्र्यात जमलेल्या गर्दीवरून भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर खरमरीत टीका केली होती.