Lockdown : गावातच अडकली टीव्ही अभिनेत्री, ना पाहण्यासाठी TV अन् ना अंघोळीसाठी बाथरूम

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे, सेलिब्रेटी देखील त्यांच्या घरात कैद आहेत. प्रत्येकजण त्यांचे व्हिडिओ लोकांमध्ये शेअर करीत आहे आणि हा वेळ कसा घालवत आहेत हे सांगत आहेत. पण टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. ती तिच्या क्वारंटाईन वेळेचा आनंद घेत नसून त्याच्याशी झगडत आहे.

दरम्यान, रतन राजपूत तिच्या गावात अडकली आहे. लॉकडाऊनमुळे ती तेथून निघू शकत नाही. आता रतन राजपूतने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हे दाखवून दिले की तिला सध्या कोणत्या प्रकारचे जीवन जगण्यास भाग पडले आहे. रतनच्या गावात सुविधांचा अभाव आहे. टीव्हीच्या अभावामुळे प्रकारच्या बातम्या व इतर अपडेट्स पासून दूर असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे. या क्षणी ती राहत असलेल्या घरात किती अडचणी येत आहेत हे तिने लोकांना दाखवून दिले.

रतनने आपल्या बाथरूमची स्थितीही दर्शविली आहे, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण रतन ज्या बाथरूमविषयी सांगत आहे तेथे ना दरवाजा आहे, ना खिडकी आहे. खिडकीच्या नावावर कपडे लटकलेले आहेत. याशिवाय कपडे धुताना रतन राजपूतने व्हिडिओही दाखविला आहे. सध्या रतन आपले सर्व काम स्वत: करीत आहे. व्हिडिओमध्ये ती अशा लोकांवरही प्रश्न उपस्थित करीत आहे जे सध्या लॉकडाउनला चुकीचे म्हणत आहेत. तिने एका व्हिडिओमध्ये सांगितले घरातला एलपीजी गॅस संपल्याने तिला स्वतः घराबाहेर जाऊन सिलिंडर भरून आणावा लागतो. रतन राजपूत आजकाल आपला संघर्ष लोकांशी शेअर करत आहे, पण त्याशिवाय ज्यांना यावेळी कोरोनाचे गांभीर्य समजू शकले नाही अशांनाही ती लक्ष्य करीत आहेत. तसेच सर्वांनी दीप प्रज्वलित करुन एकतेचा संदेश द्यावा असे आवाहनही तिने यावेळी केले.