RBI च्या कर्मचार्‍यांचा पुढाकार ! 7 कोटी 30 लाखांचा निधी PM केअरला देणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना बाधितांच्या मदतीसाठी देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या पगारातून काही भाग पीएम केअर्स फंडला देण्याचा निर्णय घेणार आहे. एकूण रक्कम 7 कोटी 30 कोटी रूपये एवढी असणार आहे. ’कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात गरजुंना मदत करण्यासाठी शासनाने पीएम केअर फंड तयार केले आहे.

देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे, बँकेतील कर्मचार्‍यांनीही कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचारी एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचे वेतन पीएम केअर फंड्ससाठी देणार आहे. कर्मचार्‍यांकडून एकूण 7 कोटी 30 कोटी रूपये पीएम केअर फंड्ससाठी देण्यात येणार आहे.

आरबीआयच्या आधी अनेक संस्था आणि सेलिब्रिटींनी पीएम केअर फंड्समध्ये मोठी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. सेलिब्रिटींव्यतिरिक्त इंडस्ट्रिअल ग्रुप्स आणि अनेक उद्योजकांनीही मदतीचा हात देऊ केला आहे. रिलायंस इंडस्ट्रीजने पीएम केअर फंड्समध्ये 500 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनीही पीएम केअर फंड्ससाठी तब्बल 15 हजार कोटींची मदत केली आहे.