Coronavirus : देशातील कोरोना बाधितांची संख्या 2 हजारांवर महिन्याभरात 3 वरुन भारत पोहचला 2036 पर्यंत

नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या आता २ हजारांहून अधिक झाली असून या पुढील काळात ती आणखी वेगाने वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारतात १४ फेब्रुवारीला एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. १५ फेब्रुवारीला देशात पहिले ३ कोरानाबाधित आढळून आले होते. त्यानंतर १५ दिवस देशात एकही नवीन कोरोना बाधित आढळून आला नव्हता. १ मार्च रोजीही देशात कोरोना बाधितांची संख्या ३च होती. त्यानंतर २ मार्च रोजी ही संख्या ६ इतकी झाली. त्यानंतर

४ मार्च २९
१० मार्च ६२
१२ मार्च ७४
१६ मार्च १२९
२० मार्च २४९
२२ मार्च ३९६
२५ मार्च ६३७
२७ मार्च ८८७
३० मार्च १२८१
३१ मार्च १३९७
१ एप्रिल १९९८

आणि २ एप्रिलला सकाळी ही संख्या तब्बल २०३६ वर पोहचली आहे.  याचबरोबर दररोज देशातील कोरोना बाधितांची संख्या कशी वाढत गेली तर ती आता गुणाकार करायला लागणार का अशी संशय व्यक्त केला जात आहे.

दररोज नवीन कोरोना बाधित आढळलेल्यांची संख्या
१० मार्च १५
१४ मार्च १८
१८ मार्च २६
२० मार्च ५५
२३ मार्च १०३
२७ मार्च १६०
२८ मार्च १००
३० मार्च २७७
३१ मार्च १४६
१ एप्रिल ६०१

यामुळे यापुढील प्रत्येक दिवस देशासाठी महत्वाचा ठरणार आहे. जर कोरोना हा तिसर्‍या टप्प्यात गेला तर त्यातून देश मोठ्या संकटात सापडणार आहे. मोठी व दाट लोकसंख्या असल्याने युरोप, अमेरिकेपेक्षा वाईट स्थिती भारताची होऊ शकते, असा इशारा तज्ञ देत आहेत.