Coronavirus : देशात 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 6977 नवे रुग्ण तर 154 जणांचा मृत्यु, आतापर्यंत 4021 बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या ६२व्या दिवशी देशातील आतापर्यंतचे २४ तासातील सर्वाधिक ७ हजार नवीन रुग्ण आढळून आले. सोमवारी सकाळपर्यंत देशात ६ हजार ९७७ नवीन रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ इतकी झाली आहे.

देशात गेल्या २४ तासात १५४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना बाधित रुग्णांची मृत्युची संख्या ४ हजार २१ वर पोहचली आहे.

देशात सध्या ७७ हजार १०३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर देशातील विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोनातून मुक्त होणार्‍यांची संख्या वाढत आहे. रविवारी दिवसभरात ३ हजार २८० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशातील ५७ हजार ७२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर आता कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like