अलर्ट : ‘कोरोना’ विषाणू ठरतेय ‘सायबर’ हल्लेखोरांचे मुख्य ‘हत्यार’, अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  सध्या जगभरातील लोक कोरोना विषाणूचा सामना करत आहे. याच दरम्यान हॅकर्स पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाले आहेत. असे असले तरी सायबर हल्ल्यांच्या घटना पहिल्यापेक्षा कमी झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच्या या वेळेत देशाची आर्थव्यवस्था ढासळत असतानाच कोरोना विषाणूशी संबंधित मालवेयर वेगाने वाढत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

द नेक्स्ट वेब च्या अहवालानुसार, फेब्रुवारीच्या मध्यास चेक पॉईंटच्या संशोधकांना सायबर हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर 28 मार्च या एकाच दिवशी ही संख्या 5 हजाराच्या पुढे गेली आहे. सरासरीनुसार सायबर गुन्हेगार दररोज 26 हजाराहून अधिक हल्ले करत आहेत.
काय आहे कोरोनाचा सायबर हल्ल्याशी संबंध

ज्यावेळी सायबर हल्ल्याच्या घटनेमध्ये वेबसाईटच्या डोमेनमध्ये ‘कोरोना’, ‘कोविड’ किंवा फाईलच्या नावामध्ये ‘कोरोना’ असे असेल तर त्याला कोरोनाशी संबंधित सायबर हल्ला म्हणतात. या व्यतिरिक्त असेही दिसून आले आहे की, अशा हल्ल्यांमध्ये ई मेलच्या विषयामध्ये (Subject) कोरोनाचा उल्लेख असतो.

मागील दोन आठवड्यामध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित 30 हजाराहून अधिक नवीन डोमेनची नोंद झाली आहे. जानेवारी 2020 पासून कोरोना विषाणूशी संबंधित 51 हजाराहून अधिक डोमेनची नोंदणी झाली आहे. यातील 2 हजार 777 संशयास्पद असून त्याची अधिक चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या साथीच्या वेळी हॅकर्शद्वारे सर्वात जास्त वापरण्यात आलेली पद्धत म्हणजे नेटफ्लिक्ससारखी उत्पादने आणि सर्व्हिस जी घरात थांबणाऱ्यंकडून जास्त वापरली जात असते. हॅकर्स कडून क्रिडिट कार्डची माहिती चोरण्यासाठी नेटफ्लिक्स सारख्या डोमेनचा वापर केला आहे. जसे netfixcovid19s.com

सुरक्षित राहण्यासाठी काय करावे

सध्या स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही वेबसाईटवर जाण्यापूर्वी स्पेलिंग काळजीपूर्वक तपासा आणि काही चुकीचे वाटल्यास ते लगेच बंद करा

ई-मेल सुरु करताना लक्ष द्या, खासकरून त्यामध्ये अॅटेचमेंट अल्यास
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला ई-मेल ओपन करु नका
कोणतीही वस्तूची खरेदी करायची असेल तर ब्रँडेड कंपनीकडूनच खरेदी करा
आलेल्या ई-मेलमधील लिंक वर क्लिक करून वस्तू खरेदी करू नका
चेक पॉईंटचे असे म्हणणे आहे की, अगर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर गुगलवर सर्च करून थेट त्या साईटवर जाऊन वस्तूची खरेदी करा.