काय सांगता ! होय, ‘कोरोना’मुळं अंत्यसंस्कारासाठी जीवाभावाच्या नातेवाईकांनी फिरवली पाठ, ‘राम’नामाचा ‘जप’ करत मुस्लिम बांधवांनी दाखवली ‘माणुसकी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे.भारतात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ९८७ झाली आहे.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी देशात लॉक डाऊन घोषित केला. मात्र,काही नागरिक या आदेशाचे उल्लंघन करताना दिसत आहे.दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवल्याची बाब उघडकीस आली आहे.तर, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर परिसरात एका हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लिम बांधवानी पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडला.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातील रविशंकर यांचा मृत्यू झाला, पण कोरोनाच्या भीतीने नातेवाईक आणि सगेसोयरे यांनी त्यांच्या घरी येणे टाळले आणि अंत्यसंस्काराला कोणी पुढे येईना, त्यावेळी रविशंकर यांच्या घरा जवळील मुस्लिम समाजातील बांधवानी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्या वरती हिंदू धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार केले. यामध्ये विशेष असं की मुस्लिम बांधवानी त्या प्रेताला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना “राम नाम सत्य है” असा रामनामाचा जपही केला. याबाबदल काँग्रेसचे जेष्ठ माजी मंत्री शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करत, हाच आपला भारत आणि हेच भारताचे स्पिरिट असल्याचे म्हणले.तसेच, हीच भारत देशाची कल्पना, याच्या सुरक्षेसाठी, जतन करण्यासाठी आणि प्रतिकारासाठी आपण प्रार्थना करू असे थरूर पुढे म्हणाले.

दरम्यान, आग्रा येथील देवकीनंदन त्यागी यांच्या पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला.त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि सगे सोयरे जमले होते.या दरम्यान, भावनाविवश झालेले पोलीस देखील काही करू शकले नाही.त्याच वेळेस त्यांच्या पतीने सर्वाना घरी जाण्यास सांगून एक मोठा निर्णय घेतला.त्यांच्या या निर्णयाने विनाकारण बेजाबदारपणे बाहेर पडणाऱ्या लोकांसमोर देशहिताचे काम करून एक आदर्श निर्माण केला आहे.तर त्यांनी आपल्या पत्नीचे अंत्यसंस्कार केवळ १० जणांच्या उपस्थितीत केले.

यामुळे एवढेच म्हणता येईल की, कोरोनामुळे माणुसकी पावला-पावला वरती दिसून येत आहे.तर उपाशी माणसाला अन्न,भूकेल्याची भूक भागवून नागरिक आपलं कर्तव्य बजवत आहे.पोलीस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आपले कर्तव्य पार पडत असून, नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.देशात कोरोनाविरोधाच्या लढ्यात हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई-बांधव एकत्र आले असून फाईट अगेन्स्ट इंडिया कोरोनाचा नारा दिला आहे.