Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटादरम्यान मोदी सरकारची आणखी एक घोषणा ! 24 तास वीजेसह मिळणार Light बिलात ‘ही’ सुट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती पाहता आता वीज कंपन्यांसाठी सरकारकडून पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. 24 तास वीज उपलब्ध करणे आणि वीज बील उशीरा भरल्यास कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही. सरकारकडून सांगण्यात आले की वीज वापरकर्ते पुढील 3 महिने वीज बील भरण्यास सक्षम दिसत नाही यामुळे वीज कंपन्यांकडे पैशांची कमतरता होऊ शकते, अशा परिस्थितीत ऊर्जा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशात 21 दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे यामुळे देशातील उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे.

सरकारने मागील तीन दिवसात मोठी पावलं उचलली आहेत. सरकारने मोफत रेशनपासून गृह कर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड ईएमआय भरण्यास सूट देण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकांना मिळणार फायदा –

CERC (सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमीशन) वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर लेट चार्ज सरचार्ज इत्यादी आकारणार नाही, सोप्या शब्दात पुरवठादार कंपन्यां ग्राहकांकडून दंड आकारणार नाहीत.

जर तुम्ही या दरम्यान बील भरत नाही. यावर कोणताही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही, यासह सरकार देशभरात 24 तास सातही दिवस वीज उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

वीजसंबंधित सरकारची घोषणा –

नव्या निर्णयांतर्गत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सरकारने सूट दिली आहे म्हणजेच कंपन्या वीज तयार करण्याची रक्कम नंतर भरू शकतात. वीज पुरवठादार कंपन्यांना वीज मिळत राहिलं.

त्यांच्याकडून तात्काळ पैसे आकारले जाणार नाहीत. वीज पुरवठा कंपन्यांना अॅडवांस पेमेंटची रक्कम आता फक्त 50 टक्के द्यावी लागेल. देशात 70 टक्के वीज कोळशातून तयार केली जाते, त्यामुळे कोळशाच्या पुरवठ्यात बाधा येता कामा नये यासाठी रेल्वेला देखील कोळसा पुरवण्यास मदत करण्यास सांगितले आहे.

You might also like