दिल्ली-मुंबई आणि चेन्नईमधील ‘कोरोना’चा कमी झाला वेग, R-value मध्ये घसरणीचा ‘हा’ आहे अर्थ, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा 18 लाख 55 हजार 331 झाला आहे. सोमवारी सुद्धा 50 हजारपेक्षा जास्त रूग्ण सापडले आणि 806 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात या व्हायरसमुळे 38 हजार 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमधून चांगली बातमी आहे. एका अभ्यासानुसार, देशाच्या तीन मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये कोरोनाचा वेग कमी होत आहे. कोविड-19च्या आर-व्हॅल्यू किंवा रिप्रोडक्टिव्ह व्हॅल्यूमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये घसरण झाली आहे, जी दर्शवते की, देशात तीन मोठ्या शहरात या महामारीचा कहर थांबण्याच्या मार्गावर आहे.

रि-प्रोडक्टिव्ह व्हॅल्यूबाबत एक्सपर्टने इशारासुद्धा दिला आहे की, जर या स्तरावर येऊन बेजबाबदारपणा केला गेला तर, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो. स्टॅटिस्टिक्स अँड अप्लिकेशन्स मॅगझीनमध्ये प्रकाशित ताज्या आकड्यांनुसार, दिल्लीत आर व्हॅल्यू 0.66, मुंबईत 0.81 आणि चेन्नईत 0.86 आहे. हे राष्ट्रीय सरासरीच्या 1.16 पेक्षा खुप कमी आहे. देशात सर्वात जास्त आर-व्हॅल्यू 1.48 आंध्र प्रदेशात आहे.

सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर जर आर-व्हॅल्यू एकाने कमी आहे, तर याचा सरळ अर्थ आहे की, एक संक्रमित व्यक्ती जास्तीतजास्त एका अन्य व्यक्तीला संक्रमित करत आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकातामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर दिव्येन्दु नंदी सांगतात की, समजात आर-व्हॅल्यूचे इतकी कमी असणे याचा अर्थ आहे की, महामारीचा सध्याचा कहर थांबत आहे. ती नियंत्रित करण्यासाठी असलेल्या उपयांद्वारे यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

नियमांचे पालन आता आणखी जास्त आवश्यक
कोरोनाबाबत अनेक शहरात सीरो-सर्वे केला जात आहे. यातून समजते की, मुंबई आणि दिल्लीत सुमारे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रहिवाशी या व्हायरसने संक्रमित झाले आहेत.

एक्सपर्ट सांगतात की, समाजाच्या स्तरावर कोणत्याही आजाराच्या विशेषाप्रती रोग प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्यूनिटी विकसित होण्यासाठी लोकसंख्येपैकी किमान 20 टक्के लोकसंख्या संक्रमित होणे आवश्यक असते. अभ्यासानुसार आर-व्हॅल्यू निश्चित कमी होत आहे, परंतु जर आपण सतर्क राहिलो नाही आणि नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली तर कोरोना पुन्हा येऊ शकतो.

रोज अमेरिकेपेक्षा जास्त येत आहेत केस
देशात कोरोनाची प्रकरणे इतक्या तेजीने वाढत आहेत की, एका दिवसात सर्वाधिक केसच्या प्रकरणात भारताने अमेरिका आणि ब्राझीलला सुद्धा मागे टाकले आहे. अमेरिकेत मागील 24 तासात 49 हजारपेक्षा जास्त केस आल्या, तर ब्राझीलमध्ये 24 हजारपेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोविड-19 मुळे सर्वात जास्त प्रभावित देशांत भारत, अमेरिका आणि ब्राझीलच्यानंतर तिसर्‍यानंबरवर आहे.

आतापर्यंत कोणत्या राज्यात किती मृत्यू
एकुण 38,135 मृत्यूंच्या प्रकरणांपैकी, महाराष्ट्रात सर्वात जास्त 15,842, तमिळनाडुत 4,132, दिल्लीत 4,241, कर्नाटकमध्ये 2,496, गुजरातमध्ये 2,486, उत्तर प्रदेशात 1,730, पश्चिम बंगालमध्ये 1,678, आंध्र प्रदेशात 1,474 आणि मध्य प्रदेशात 886 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राजस्थानमध्ये 703, तेलंगनामध्ये 540, हरियाणामध्ये 423, पंजाबमध्ये 423, जम्मू-कश्मीरमध्ये 396, बिहारमध्ये 329, ओडिसात 197, झारखंडमध्ये 118, आसाममध्ये 105, उत्तराखंडमध्ये 86 आणि केरळात 82 लोकांचा मृत्यू संक्रमणामुळे झाला आहे.

काय आहे रिकव्हरी आणि डेथ रेट
डाटानुसार, कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 65.44 टक्के झाला आहे, तर मृत्यूदर कमी होऊन 2.11 टक्के राहिला आहे. संसर्गाच्या एकुण संसर्गात परदेशी नागरिक सुद्धा सहभागी आहेत.