सार्वजनिक वाहतूकीतून ‘कोरोना’ पसरण्याचा धोका जास्त, परीक्षणानंतर झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे अनेक खुलासे समोर येत आहेत. या आठवड्यात आलेल्या एका अहवालानुसार, कोरोना विषाणू पसरण्याचा सर्वाधिक धोका सार्वजनिक परिवहनातून होऊ शकतो, कारण बसमध्ये जास्त गर्दी असते आणि हवा बंद असते.

अहवालात सांगण्यात आलं की, चीन मध्ये एका कोरोना रुग्णाने बसने प्रवास केला होता, त्या एकट्याने 67 लोकांना संक्रमित केलं होतं. हा अहवाल यासाठी महत्वाचा आहे की, भारतात अन लॉक 4 ची प्रक्रिया 1 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे आणि त्यात बस आणि मेट्रो सुरु करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिका मेडिकल असोसिएशनच्या एका पत्रिका ‘जेएएमए इंटरनल मेडिसिन’च्या रिपोर्टनुसार पूर्वीय चीनमध्ये एका धार्मिक सभेत सहभागी होण्यासाठी लोक दोन बसमध्ये जात होते. एका बस मध्ये कोरोना संक्रमित व्यक्ती प्रवास करत होता. त्यानेच इतर लोकांना संक्रमित केलं.

या अहवालाच्या लेखकांनी सांगितलं की ते लोक ज्या बस मध्ये प्रवास करत होते त्या बसमध्ये हवा बंद होती आणि एक कोरोना संक्रमित व्यक्ती होती. त्यामुळे बस मधील इतर लोकांना कोरोनाची लागण झाली. तर दुसऱ्या बसमधील व्यक्तीना कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत.

रिपोर्टनुसार ज्या व्यक्तीने इतर लोकांना संक्रमित केलं त्याला सर्दी खोकला असे लक्षणं दिसत होते, त्याची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. बस मध्ये हवा बंद होती, आणि गर्दी होती.

आणखी एका रिपोर्टनुसार, चीनच्या ग्वाझु शहरात डिनर टेबल मध्ये एक मीटरचे अंतर असून देखील कोरोना संक्रमण झाले. त्या ठिकाणी 24 जानेवारील तीन कुटुंबातील लोकांनी रात्री जेवण केलं होतं.

इथं जेवण करणाऱ्या लोकांपैकी एकाचा रिपोर्ट नंतर कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती एप्रिल मध्ये युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एन्ड प्रेव्हेन्शन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आली.