Coronavirus Restrictions | सगळं सुरु मग ब्युटी पार्लर आणि जीम का बंद? वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने (State Government) कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या (Omycron) वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध (Coronavirus Restrictions) लावण्याची घोषणा केली. यात सलून (Salon) म्हणजे केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ब्युटी पार्लर (Beauty Parlors) आणि जीम (Gym) बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधामध्ये (Coronavirus Restrictions) बदल करत सुधारित आदेश जारी (Revised Order Issued) केले आहेत.

सुधारीत नवीन नियमावलीनुसार (New Regulations) जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.
50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे (New Rules) पालन करणे गरजेचे असणार आहे.
यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यासह ग्राहकांनी लस (Vaccine) घेणे गरजेचे आहे.
या दोघांनी लसीचे दोन डोस (Two Doses) घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Coronavirus Restrictions)

 

जिम बाबतचे आदेश
व्यायामशाळा (जीम) देखील क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, व्यायाम करताना मास्क (Mask) वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार असल्याचे सुधारित आदेशात म्हटले आहे.

 

सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यावसायिकांनी केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यावसायिकांची आज (रविवार) दुपारी ऑनलाइन बैठकही झाली होती. महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे बैठक आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशनचे (Maharashtra Salon and Beauty Parlor Association) प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद (Somnath Kashid) यांनी दिली होती.

Web Title :-  Coronavirus Restrictions | Gyms and beauty parlors permission to start at 50 percent capacity Coronavirus Restrictions

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज

 

Coronavirus Restrictions In Maharashtra | … तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

 

Protect Against Omicron Covid Variant | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर WHO ची गाईडलाईन आवश्य करा फॉलो, तेव्हाच राहाल सुरक्षित

 

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण