Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra | राज्यातील निर्बंध लवकरच हटणार; आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra | राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. संसर्गाचा वेगही कमी झाला असल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत (Disaster Management Committee) राज्यातील निर्बध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला (Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra). दरम्यान, यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार असून त्यांच्या मान्यतेनंतरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती (Chief Secretary Debashish Chakraborty) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) कोरोनाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. राज्यातील निर्बंध हटविताना संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

 

स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती (Coronavirus Situation) कशी आहे त्यावर जिल्हा समिती निर्बंधांबाबत निर्णय घेईल.
सध्या हॉटेल (Hotels), चित्रपटगृहे (Theaters), जिम (Gyms), स्पा (Spas) आदी ठिकाणी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा आहे.
ती पूर्णत: हटवली जाण्याची शक्यता आहे.
तसेच विवाहासाठीची 200 लोकांच्या उपस्थितीची अट ही शिथिल होईल किंवा पूर्णत: उठवली जाईल.
यावर आता टास्कफोर्स (TaskForce) आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

 

Web Title :- Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra | coronavirus restrictions in maharashtra to be removed decision of disaster management committee cm uddhav thackeray will take final decision

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा