Coronavirus Lockdown : ‘संध्याकाळी दारूची दुकानं उघडी ठेवा, ‘लॉकडाऊन’मध्ये दूर होईल स्ट्रेस’, ऋषी कपूरचं ‘आवाहन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळं देशात लागू झालेल्या लॉकडाऊनचा आजा चौथा दिवस आहे. लॉकडाऊन असताना अनेक सेलेब्स आपल्या मन की बात बिंधास्तपणे सोशलवर शेअर करताना दिसत आहेत. अभिनेता ऋषी कपूरनंही आपलं म्हणणं मांडलं आहे. ऋषी कपूर यांनी ट्विट करत केंद्र आणि राज्य सरकारला दारूची दुकानं उघडण्याचा सल्ला दिला आहे.

ऋषी कपूरनं एकामागोमाग एक ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “विचार करा. सरकारनं सायंकाळी काही वेळासाठी दारूची दुकानं खुली करायला हवीत. मला चुकीचं समजू नका. माणसं घरातच आहेत चहुबाजुला डिप्रेशन आणि अनिश्चितता आहे. पोलीस, डॉक्टर आणि नागरिकांना थोडा दिलाास मिळण्याची गरज आहे. पुढे ऋषी कपूर म्हणतात, “ब्लॅकमध्ये तर विकली जात आहे.”

आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात, “राज्य सरकारला या काळात एक्साईज ड्युटीद्वारे पैशांची खूप आवशकता आहे. फ्रस्ट्रेशनसोबत डिप्रेशन व्हायला नको. पित तर आहेत. कायदेशीर परवानगी द्या. वेडेपणा नाही हा माझा विचार आहे.”

ऋषी कपूर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करत आपलं मतही मांडताना दिसत आहे. अलीकडेच ऋषी यांनी ट्विट करत आणीबाणी जाहीर करण्याचीही मागणी केली होती.