Lockdown : दारू विक्री नंतर ऋषी कपूरचं आणखी एक विधान, म्हणाले – ‘देशात आणीबाणी लागू करा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात आणीबाणी जाहीर करा त्यानंतर.
येथे लष्कराची गरज असल्याचे मत अभिनेता ऋषी कपूर यांनी व्यक्त केले आहे. देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे ? अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऋषी कपूर सध्या ट्विटरवर मत उघडपणे मांडत आहेत. याआधी त्यांनी राज्य सरकारने मद्यविक्री सुरू ठेवावी अशी मागणी केली होती.

ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये, देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे ? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असे मी म्हणतो आहे. त्यासाठी आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. याआधी ऋषी कपूर यांनी ‘राज्य सरकारला उत्पादन शुल्क विभागाकडून पैशांची फार गरज आहे. संतापात नैराश्याची भर पडू नये. जसे आधी मद्यपान करायचे तसे लोक करतच आहेत तर कायदेशीर करून टाका. ढोंगीपणा करू नका. असे माझे विचार आहेत’, असे त्यांनी ट्विटरवर मत मांडले होते. या ट्विटमुळे नेटकर्‍यांनी त्यांना ट्रोलसुद्धा केले होते. लॉकडाउनला कोणीच गंभीरपणे पाहत नाही, सेलिब्रिटीसुद्धा नाही, असे एका युजरने म्हटले होते.