Coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या डेडबॉडीपासून संसर्गाचा धोका किती वेळ असतो? AIIMS च्या अहवालातून झालं स्पष्ट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले. अशा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यही मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नाही. अशी एकूण परिस्थिती असताना दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ ते २४ तासानंतर नाक आणि घशात कोरोना विषाणू सक्रिय राहत नसल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांनी दिली ते म्हणाले की, संक्रमित मृतदेहात १२ ते २४ तासानंतर हे विषाणू राहत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जास्त नाही. या संशोधनात जवळपास १०० मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

एम्समधील फॉरेन्सिक मेडिसीन विभागात कोरोना पॉझिटिव्ह मेडिको लीगल मृतदेहांवर वर्षभर अभ्यास करण्यात आला आहे. मतृदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पार्थिवाच्या शरीरातून बाहेर येणारे द्रव पदार्थ टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नाक आणि घशाचा भाग बंद केला पाहिजे. त्याच बरोबर असे मृतदेह हाताळणाऱ्यांनी मास्क ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे असे डॉक्टरांनी सांगितले.

मृतदेहाच्या अस्थी सुरक्षित
अस्थीतून संक्रमणाचा धोका नाही. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थी आणि राख ही पूर्णपणे सुरक्षित आहेत. मे २०२० मध्ये एम्सने कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनतर एक मार्गदर्शक सूचना जरी केली होती. त्यामध्ये शवविच्छेदन करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. मृतकाच्या शरीरात असणारे द्रव पदार्थच्या संपर्कात येणंही जीवघेण्या रोगाच्या संपर्कात येण्याचा धोका होऊ शकतो, असे म्हंटले होते.