Coronavirus : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 23 गाड्या 31 मार्चपर्यंत रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं आता गर्दी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं मुंबईत लोकलच्या स्वच्छतेचं कामही हाती घेतलं आहे. गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गर्दी टाळण्यात यश आलं तर कोरोनाचा प्रसार रोखला जाऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वेनं लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत.
railway
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून आता 50 रुपये केलं आहे. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आणि टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर सह वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर अशा सर्व शहरात रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आलं आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये केलं आहे. तब्बल 250 स्टेशन्स आणि 6 डिव्हीजन्समध्ये आता प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांना मिळणार आहे.