‘कोरोना’ महामारी : स्वत: च्या तेलाला आग लावण्याचा विचार का करीत आहे रशिया ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे, ज्यामुळे तेलाचा वापरामध्ये अचानक घट झाली आहे. तेलाचा वापर रेकॉर्ड पातळीवर कमी झाल्यामुळे अनेक देशांचे तेलाचे साठेही भरले आहेत. अशा परिस्थितीत आता तेल उत्पादन करणारे देश विचार करीत आहेत की त्यांनी तेलाचे काय करावे?

तेल उत्पादनात रशिया हा जगातील आघाडीचा देश आहे. एका वृत्तसंस्थेने रॉयटर्सने तेल उद्योगाशी संबंधित चार स्रोतांचा हवाला देत म्हटले आहे की, एका आठवड्यात रशियाला कराराअंतर्गत तेल उत्पादनात 20 टक्के कपात करावी लागेल. या कारणामुळे रशिया तीन पर्यायांवर विचार करीत आहे. ते पर्याय म्हणजे तेल विहिरी दुरुस्त करणे, विहिरी बऱ्याच काळासाठी अशाच राहू देणे अन्यथा तेलाला आग लावणे.

रशियाने ओपेक (पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ऑर्गनायझेशन) आणि नॉन-ओपेक देशांशी एकत्रितपणे जागतिक बाजारातून दररोज 10 मिलियन बॅरल तेल बाजारात संतुलन राखण्यासाठी एक करार केला आहे. एकूण तेलपुरवठ्यात 20 टक्के कपात होईल. 1 मेपासून या कराराची अंमलबजावणी होणार आहे.

गेल्या आठवड्यात रशियाच्या ऊर्जामंत्र्यांनी तेल कंपन्यांना ओपेक प्लस कराराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे उत्पादन 20 टक्क्यांनी कमी करण्यास सांगितले. सूत्रांनी रॉयटर्स एजन्सीला सांगितले की, कंपन्या ज्या क्षेत्रात आधीपासूनच उत्पादन कमी पडत आहेत त्या क्षेत्रावर प्रथम लक्ष केंद्रित करत आहेत. ल्युकोइल दररोज 1.65 दशलक्ष बॅरल तेल तयार करतो. आता ल्युकोइल आपली अनेक तेल क्षेत्रे बंद करण्याचा विचार करीत आहे.

रॉसनेफ्ट आणि गॅझप्रॉम नेफ्ट यांचे जॉइंट वेंचर स्लावनेफ्ट, पश्चिम सायबेरियातील मेगानोफेटेज युनिटची अनेक फील्ड बंद करण्याचा विचार करीत आहेत. तेल उद्योगाशी संबंधित अन्य दोन स्त्रोतांनी सांगितले की, कमी उत्पादन क्षमता असणार्‍या तेल विहिरी प्रथम बंद केल्या जाऊ शकतात. तथापि, तेलाचा पुरवठा कमी करण्यासाठी विहिरी अनिश्चित काळासाठी बंद करण्याऐवजी दुरुस्तीसाठी तात्पुरत्या बंद केल्या जातील. सध्या नवीन पेट्रोलियम खाणी शोधण्यासाठी ड्रिलिंग देखील रोखली जाईल.

तेल विहिरी दुरुस्त केल्यामुळे कंपन्यांना त्यांची उत्पादन क्षमता राखता येईल. कंपन्यांना त्यांचा नफा दीर्घकाळ गमावायचा नसतो. एका सुत्राने सांगितले की, ‘मागणी कमी झाली आहे हे खरे आहे परंतु तेलाच्या फील्ड्सला कुलूप लावणे हे कारण असू शकत नाही. कधीकधी आपण तेल उत्पादन करणे आणि जाळणे देखील चांगले आहे. एकदा तेलाची उत्पादन क्षमता संपली की पुनर्प्राप्त होण्यास बरीच वर्षे लागतात. एकदा सोव्हिएत युनियनमध्ये तेल उत्पादन अर्धवट राहिले होते. त्यानंतर तेल उत्पादन क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी त्याला पूर्ण दशक लागला होता.’

जगातील बर्‍याच देशात तेल साठवण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत मागणी अल्प प्रमाणात असताना तेल पुरवठा वाढत आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींवर होतो. त्याच महिन्यात अमेरिकेतील तेलाचे दर शून्यापेक्षा खाली गेले होते. जानेवारी महिन्यात चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व रिफायनरीज बंद झाल्यापासून तेलाच्या साठ्यात जगातील सरासरी तीन चतुर्थांश भाग भरले आहेत.