खुशखबर ! रशियामध्ये या आठवड्यातच लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते कोरोना ‘वॅक्सीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा कहर सुरूच असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी 11 ऑगस्टला घोषणा केली होती की, त्यांनी कोरोना वरील वॅक्सीन बनवली आहे. तेव्हा संपूर्ण जगातील तज्ञ आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर रशियाने पुन्हा एकदा खुशखबर देत सांगितलं की रशियामध्ये या आठवड्यातच लोकांसाठी कोरोना ‘वॅक्सीन’ उपलब्ध होणार.

रशियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या आठवड्यात कोरोना ‘वॅक्सीन’ ‘स्पुतनिक वी’ सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. या वॅक्सीन तयार झाल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी 11 ऑगस्टला केली होती.

रशियन न्यूज एजन्सी TASS ने रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये डेप्युटी डायरेक्टर असणाऱ्या डेनिस लोगुनोव याचा हवाला देत सांगितलं की, ‘स्पुतनिक वी’ वॅक्सीन रशियन आरोग्य मंत्रालयाच्या परवानगी नंतर त्याचा विस्तृतपणे उपयोग केला जाईल. आरोग्य मंत्रालयाकडून वॅक्सीनची चाचणी सुरु आहे आणि लवकरच याची परवानगी दिली जाणार आहे.

अहवालानुसार त्यांनी सांगितलं की, सामान्य जनतेसाठी वॅक्सीन उपलब्ध करून देण्यासाठी एक विशिष्ठ प्रक्रिया आहे. 10 ते 13 सप्टेंबर पर्यंत लोकांना वॅक्सीनची विक्री करण्याची परवानगी मिळेल. त्यानंतर लोकांना ही वॅक्सीन दिली जाणार आहे.

ही वॅक्सीन मास्कोच्या गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने एडिनो व्हायरसला बेस बनवून तयार केली आहे. या वॅक्सीनचे दोन ट्रायल जून-जुलै महिन्यात केले गेले होते त्यामध्ये 76 स्वयंसेवकांचा समावेश होता. या रिसर्चमध्ये 100% अँटीबॉडी विकसित झाल्याचं दिसून आलं होतं.