Coronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी ज्येष्ठ-वृध्दांची काळजी घ्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केल्या ‘या’ 10 सूचना

पोलिसनामा ऑनलाइन – देश आणि जगभरात कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची संख्या ७.२४ लाख पेक्षा जास्त झाली असून या व्हायरसमुळे ३४ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही दररोज एक ना एक तरी कोरोनाचा रुग्ण सापडत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत आणि मृत्यूबाबत आरोग्य तज्ञ सांगतात की, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. वाढत्या वयानुसार वृद्धांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि म्हणूनच त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा धोका होण्यापासून संरक्षण करण्यासाठी सल्लामसलत केली आहे.

मंत्रालयाकडून सोमवारी केलेल्या आरोग्य सल्लामसलतीत सांगितले गेले की, या व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी वृद्धांनी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे.

वयस्कर लोकांना घरीच नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेला.  सोबतच घरी राहूनच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी त्यांनी नियमितपणे साबणाने हात आणि तोंड धुवत राहिले पाहिजे. घराबाहेर न जाण्याच्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करायचे सांगत बाहेरून आलेल्या लोकांना भेटायचे नाही असे सांगितले. भेटणे फारच महत्वाचे असेल तर एक मीटर अंतरावरून सुरक्षितपणे भेटावे. वृद्धांनी घरात बनलेले ताजा पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे.

त्यांना गरम अन्न, सतत पाणी पिणे आणि नियमितपणे ताज्या फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच त्यांनी पहिल्यापासून चालू असलेल्या औषधांचे नियमितपणे सेवन केले पाहिजे.  मोतीबिंदू, गुडघा प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया सध्यातरी टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे.n वृद्धांनी सर्दी-ताप, खोकला यासारखे आजार असलेल्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे. वृद्धांना ताप, सर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर जवळच्या वैद्यकीय सेवेत संपर्क करावा.

खरं तर, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यूच्या बाबतीत वृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याचे लक्षात घेऊन वृद्धांसाठी हे सल्ले देण्यात आले आहेत. संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मंत्रालयाने काढलेल्या सल्ल्यात असे म्हटले आहे की, वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त वय असल्यामुळे शरीराच्या तुलनेने रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत वृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.