काय सांगता ! होय, लक्षणं नसताना देखील फक्त लाळेव्दारे ‘या’ पध्दतीनं करता येईल ‘कोरोना’ टेस्ट, तज्ज्ञांनी शोधली सोपी पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना वायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे. कोरोनाची तपासणी करण्यासाठी सध्या आरटीपीसीआर चाचणी केली जाते. ह्या चाचणीसाठी नाक आणि घश्यातील स्वॅब घेतले जातात. या स्वॅबद्वारे तुम्हाला कोरोना झाला आहे कि नाही हे पाहिलं जाते. अनेकदा ह्या टेस्ट करणं खूप खर्चिक असतं. तसेच रिपोर्ट मिळायला सुद्धा वेळ लागतो. या चाचण्याव्यतिरिक्त तुम्ही एका सोप्या चाचणीद्वारे तुम्हाला कोरोना झाला आहे कि नाही हे बघू शकता. या चाचणीला RT-LAMP असे म्हणतात.

सध्यातरी ज्यांना लक्षण आहे तेच लोक हि चाचणी करतात पण RT-LAMP हि चाचणी सोप्पी असल्यामुळे ज्यांना लक्षण नाही ते लोकसुद्धा हि चाचणी करू शकतात. यासंबंधातील वृत्त हिंदूस्थान टाईम्सकडून देण्यात आले आहे. जपानमधील होक्कायदो विद्यापीठातील संशोधकांकडून RT-LAMP चाचणीची परिणामकता तपासण्यात आली. Clinical Infectious Diseases जर्नलमध्ये ह्या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोनाची कसलीही लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांसाठी ही टेस्ट उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. संशोधकांकडून ह्या चाचणीसाठी जवळपास २ हजार लोकांच्या नाक आणि तोंडातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. अनेक लोकांच्या दोन्ही चाचण्या सारख्याच आल्या होत्या.

नाकातील स्वॅब नमुन्यातून ७७ ते ९३ टक्के इन्फेक्शनचं निदान झालं होतं तर लाळेच्या नमुन्यातून ८३ ते ९७ टक्के इन्फेक्शनचं निदान झालं होतं. याशिवाय कोरोनाचं संक्रमण झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी दोन्ही चाचण्यांची ९९.९ टक्केवारी होती. तज्ज्ञ तेशिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”लाळेची चाचणी सोपी असून ती फायदेशीर आहे यामुळे रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागत नाही. साधारणपणे nasopharyngeal swab testing लोकांना नाकाचे आणि तोंडातील स्वॅब द्यावे लागतात.दरम्यान स्वॅब घेत असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून संक्रमणाचा धोका असतो. या तुलनेत लाळेचे नमुने देणे सोपे असल्याने हि चाचणी फायदेशीर आणि सोयीस्कर आहे.

कोरोनामुळे पुरूषांमधील ‘या’ हार्मोन्सचं संतुलन बिघडत आहे.

जर टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी असेल तर मृत्यूचा धोका अधिक असतो.पण नवीन संशोधनानुसार कोरोना व्हायरसमुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर बिघडू शकतो.या स्थितीमुळे पुरूषांना रोगातून बाहेर येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.रिसर्च जर्नल ‘द एजिंग मेल’ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जसजसं पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनच प्रमाण कमी होत जाते तसतसं त्यांची आयसीयूमध्ये भरती होण्याची शक्यता वाढत जाते.

संयुक्त अरब अमीरातच्या मेर्सिन विद्यापीठातील युरोलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमख संशोधक सियान यांनी यांच्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमी असेल तर कोरोनाचा धोखा अधिक असतो. पण हा पहिलाच असा अभ्यास आहे. ज्यामधुन असे समोर आले आहे कि कोरोना संक्रमणामुळे पुरूषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होत आहे.

टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो त्यामुळे धोखा अधिक वाढतो. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येण्यास वेळ लागतो. कोणत्याही संक्रमणापासून बचाव करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची भूमिका खूप महत्वाची असते. या हार्मोनला सेक्स हार्मोन असे देखील म्हंटले जाते. हार्मोन आजारांशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी टेस्टोस्टेरॉन खूप महत्वाचा आहे.